vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पॅरिसमध्ये नग्न अवस्थेत रेड कार्पेटवर पोहोचली युक्रेनियन महिला; शरीरावर लिहिलं ….

नग्न अवस्थेत रेड कार्पेटवर पोहोचली युक्रेनियन महिला; शरीरावर लिहिलं होतं…

 

विदेश  प्रतिनिधी

Cannes 2022: पॅरिसमध्ये आयोजित 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) मध्ये चित्रपटसृष्टीशी निगडीत जगभरातील बड्या व्यक्ती हजेरी लावत आहेत. दरम्यान, युक्रेन (Ukraine) मधील महिलांवरील लैंगिक अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी एका महिलेने कान्सच्या रेड कार्पेट (Red Carpet) वर नग्न अवस्थेत निदर्शने केली. यादरम्यान महिलेला हटवण्यासाठी सुरक्षा दलाला पुढे यावे लागले आणि तिला जबरदस्तीने रेड कार्पेटवरून हटवण्यात आले. या घटनेने तेथे उपस्थित असलेले सेलिब्रिटी आणि लोकही आश्चर्यचकित झाले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेने तिच्या संपूर्ण शरीरावर बॉडी पेंट केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिने पेंटसह शरीरावर संदेश देखील लिहिला आहे. जेव्हा ही महिला रेड कार्पेटवर नग्न अवस्थेत पोहोचली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला थांबवून कपडे घातले आणि तिला ओढून नेले. 17 मे पासून पॅरिसमध्ये 75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. या आंदोलक महिलेने तिचे शरीर युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात रंगवले होते

महिलेच्या छातीवर आणि पोटावर ‘आमच्यावर बलात्कार करणे थांबवा’ असे लिहिले होते. याशिवाय महिलेच्या पाठीवर आणि पायावर रक्ताप्रमाणे लाल रंग दिसून आला. जे बलात्काराचे लक्षण आहे. जॉर्ज मिलरच्या थ्री थाउजंड इयर्स ऑफ लाँगिंगच्या प्रीमियरच्या वेळी ही घटना घडली. ज्यात इद्रिस एल्बा आणि टिल्डा स्विंटन यांच्या भूमिका आहेत. ही घटना घडली तेव्हा दिग्दर्शक आणि स्टार्स उपस्थित होते.

कान्स फिल्म फेस्टिव्हल हा जगातील सर्वात प्रतिष्ठित सिनेमा कार्यक्रमांपैकी एक आहे, जो दरवर्षी उन्हाळ्यात कान्स, फ्रान्समध्ये आयोजित केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील काही मोठ्या आणि समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांचे प्रीमियर आणि स्क्रीनिंग केले जाते.

 

संबंधित पोस्ट

नॉर्थ कोरियाचा हुकूमशाह किम जोंग याला जडला गंभीर आजार…

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानात अफगाणिस्तानचा एअरस्ट्राइक! PM कार्यालयाजवळ ड्रोन हल्ला; इस्लामाबादकडून 

युक्रेनमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना मदत केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

बांगलादेशातील पुन्हा एकदा हिंदू व्यावसायिकावर गोळ्या झाडून हत्या

घानामध्ये भीषण स्फोट; १७ जणांचा मृत्यू, शेकडो इमारतींचे नुकसान

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

vishwatmaklokswamivarta