vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, प्रतिनिधी : अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नवीन रुग्णालयाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे तसेच उपचार सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करून आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे.

रुग्णालयात सध्या पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट नसल्यामुळे हृदयविकार उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सर्जनची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच एंजिओग्राम मशीनच्या साहाय्याने एंजिओग्राफीसारख्या सेवा सुरू आहेत भविष्यात या सेवांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.याशिवाय कॅन्सर उपचारांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

0000

संबंधित पोस्ट

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम  पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे..

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने  सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्र्यांच्या हस्ते ‘एम.ई.अे. इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो-२०२६’ चे उद्धाटन

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पीक परिस्थितीची पाहणी

vishwatmaklokswamivarta