vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

रेपो दरांमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ, कर्जाचे हप्ते महागणार; पाहा काय म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास

रेपो दरांमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ, कर्जाचे हप्ते महागणार; पाहा काय म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास…

 

केंद्रीय रिझर्व्ह बँक (RBI) अर्थातच आरबीायने आज (बुधवार, 8 जून 2022) बेंचमार्क पॉलिसी रेट रेपो रेट (Repo Rate) मध्ये 50 बेसीस पॉइंट म्हणजेच 0.5% वाढ (RBI Repo Rate Hike) केली आहे. परिणामी रेपो रेट आता 4.90% इतका झाला आहे. देशातील वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीायने अर्थव्यवस्थेतील क्रेडीट फ्लो नियंत्रित करण्यासाठी पॉलिसी रेपो रेट जो आरबीआय बँकांना क्रेडीट रुपात दिते त्यात 50 बेसीस बॉइंट्सची वाढ केली आहे. या निर्णयामुळे बँकांमधून कर्ज घेणे अधिक महाग होणार आहे. या आधी आरबीआयने 4 मे रोजी आरबीआय गवर्नरने अर्थव्यवस्थेत क्रेडीट फ्लो नियंत्रित करण्यासाठी पॉलिसी रेपो रेट 40 बेसीस बॉइंटने वाढवून 4.40% करण्याची घोषणा केली होती. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आरबीआयने विद्यमान आर्थिक वर्षासाठी महागाईचे अंदाज वाढवून तो 6.7% इतका केला आहे. या आधी महागाई 5.7% इतकी राहील असा अंदाज होता. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, आरबीआय आता महागाई कमी करण्याबाबत प्रययत्न करत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात टोमॅटो आणि कच्चा तेल दरात काही प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महागाई वाढण्यात झाला आहे. महागाई दर विद्यमान आर्थिक वर्षात पहिल्या तीन तिमाहीमध्ये 6% च्या वर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारद्वारा केल्या जाणाऱ्या उपाययोजनांनी महागाई खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

संबंधित पोस्ट

विधानपरिषद लक्षेवेधी गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणि १ हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा

फॉर्म 16 म्हणजे काय? IT Return भरताना तो का महत्त्वाचा असतो?

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

गोवंश अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्जासाठी 31 डिसेंबरची मुदत….

vishwatmaklokswamivarta