vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची धुव्वाधार बॅटिंग, रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

 मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची धुव्वाधार बॅटिंग, रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

[ मुंबई प्रतिनिधी

: मान्सून कधी येतो करता करता आता तो आला आणि चांगलाच स्थिरावलाही आहे. जवळपास दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईमध्ये कुलाब्यापासून अगदी अंधेरी आणि त्यापुढील परिसरात, तर तिथे ठाणे, कल्याण – डोंबिवलीतही पावसानं दमदार हजेरी लावली.

 

नवी मुंबईतही पावसाची हजेरी वातावरणात थंडावा आणून गेली. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मुसळधार होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याकडून या भागात ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

 

मागील दोन दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात साचल्याच्याही घटना घडल्या आहेत. मुंबईतील दादरजवळ हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. दरवर्षी पावसाळ्यात हिंदमाता भागात पाणी साचतं. मुंबई महानगरपालिका दरवर्षी पाणी साचू नये म्हणून उपाययोजनाही करते मात्र परिस्थिती जैसे थे आहे.

पावसाचे थेट परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाले आहेत. काही मिनिटांच्या उशिरानं रेल्वे धावत आहेत. तर, रस्ते वाहतुकीवरही पावसाचे परिणाम दिसून येत आहेत. अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर, काही वाहने या पाण्यात अडकली होती. सखल भागात पाणी साचल्यानं पश्चिम उपनगरांतील अनेक भागात वाहतूक खोळंबली होती.

संबंधित पोस्ट

कांदिवलीत एकाच सोसायटीमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण

vishwatmaklokswamivarta

इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी गणरायाच्या आरतीचा मान ‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन,उच्चन्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठात,सरन्यायधीश चंद्रचुड यांच्या हस्ते ध्वजारोहण

vishwatmaklokswamivarta

INS सतलज’ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक

vishwatmaklokswamivarta