vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक

मुंबई, प्रतिनिधी : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे सध्या स्वीडन दौऱ्यावर असून, राज्याच्या मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी ते बैठक घेत आहेत.या दौऱ्यादरम्यान मंत्री राणे यांनी स्वीडनमधील नामांकित सागरी तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांशी गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि रोजगार निर्मिती यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

मंत्री राणे यांनी सागरी बॅटरी निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी, ‘इचान्डीया (Echandia)’ आणि आधुनिक पुरवठा साखळी व स्वयंचलित वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी संस्था ‘इनराईड (Einride)’ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या कंपन्यांसोबत राज्यात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘ग्रीन इंडस्ट्रीज’ धोरणांतर्गत या कंपन्यांना सर्व आवश्यक सुविधा देण्याची तयारी राज्य शासनाने दर्शवली असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी या कंपन्यांना महाराष्ट्रात उत्पादन युनिट्स व तंत्रज्ञान केंद्रे उभारण्यासाठी आमंत्रणही दिले.

या बैठकांमुळे राज्यात नवीन रोजगार निर्मिती, हरित तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. स्वीडनमधील मेरीटाईम क्षेत्रात महाराष्ट्राबाबत उत्सुकता वाढली असून, या दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि युरोपीय सागरी उद्योगांमध्ये नव्या सहकार्याच्या दिशा खुल्या होतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

या दौऱ्यात अंबर अयाडे, ग्रामीण एन्हान्सर्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एफडीआयचे सदस्य उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

पदवीधर मतदारांच्या संख्येत वाढ होणार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पदवीधर मतदार संघासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; एका महिन्यात १ लाख ७ हजार मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक  

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती