vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयआणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस

केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयआणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी….

शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे.

काल तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत  यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज या घटनेचे पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून  ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयटी (IT) सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे. तरी आता फक्त महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभरात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

 

राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून या घटनेवर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहे. कॉंग्रेससह  राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून  शिवसेना खासदार संजय राऊत यांना पाठींबा दर्शवण्यात आला आहे.  विविध नेत्यांकडून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. तरी केंद्र सरकारकडून राजकीय अजेंडांसाठी ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयटी (IT) सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहेत आणि या एजन्सींच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना गप्प करण्यासाठी ताब्यात घेतलं जात असल्याची टीका केंद्र सरकारवर केली जात आहे

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

विधानसभा निवडणुकीत राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक –जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी1700 कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी देणार   -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हा वार्षिक योजना (2026-27) राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र काँग्रेस यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरवला – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर एकत्र होणार सुनावणी…