vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी देशात आज मतदान, एनडीएचे जगदीप धनखड विरुद्ध युपीएच्या मार्गारेट अल्वा यांच्यात सामना

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी देशात आज मतदान, एनडीएचे जगदीप धनखड विरुद्ध युपीएच्या मार्गारेट अल्वा यांच्यात सामना…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

उपराष्ट्रपती पदासाठी देशात आज (6 ऑगस्ट) निवडणूक  पार पडत आहे. भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विरुद्ध काँग्रेस प्रणित यूपीएचे उमेदवार मार्गारेट अल्वा  यांच्यात हा सामना रंगत आहे. सुरुवातीपासूनच जगदीप धनखड यांचे पारडे जड मानले जात आहे.

 

उपराष्ट्रपती पदासाठी देशात आज (6 ऑगस्ट) निवडणूक  पार पडत आहे. भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विरुद्ध काँग्रेस प्रणित यूपीएचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात हा सामना रंगत आहे. सुरुवातीपासूनच जगदीप धनखड यांचे पारडे जड मानले जात आहे. असे असले तरी लोकशाहीमध्ये आणि राजकारणात काहीही घडू शकते. जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांना राज्यपाल पदावरुन थेट उपराष्ट्रपती पदावर संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या निवडणुकीतही मतदार पक्षाच्या निर्णयानुसार मतदान करणार की, याही वेळी क्रॉस वोटींग होणार याबाबत उत्सुकता आहे.

भाजपचे पारडे सुरुवातीपासूनच जड आहे. परंतू, विरोधकांमध्ये अद्यापही विरोधाभासाचे वातावरण आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे. काँग्रेसकडे 36 खासदार आहेत. तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारसोबत त्यांचा नेहमीचा संघर्ष सर्वश्रूत आहे. असे असतानाही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने उपराष्ट्रपती पदासाठी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या बाजूला आम आदमी पार्टी (AAP), टीआरएस, AIMIM आणि JMM या पक्षांनी मार्गारेट अल्वा यांना पाठींबा देणयाची घोषणा केली आहे. बीएसपी आणि टीडीपी यांनी धनकड यांना पाठिंबा दर्शवला आहे. वायएसआरसीपी आणि बीजेडी या पक्षांनी अल्वा यांना पाठिंबा दर्शवला आहे.

आज सकाळी 10 वाजलेपासून सांयकंकाळी 5 वाजेपर्यंत उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे. मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या 80 वर्षीय जेष्ठ नेत्या आहेत. या आधी त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. याशिवाय त्या केंद्रीय मंत्री आणि राज्यपालही राहिल्या आहेत. तर धनकड हे 71 वर्षांचे आहेत. त्यांनी मूळचे राजस्थानचे आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात समाजवादातून झाली. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते नामवंत वकीलही राहिले आहेत.

 

संबंधित पोस्ट

कोल्हापुरातील पन्हाळगडावर रोज अडीचशे  छात्र  सैनिक जय शिवाजी, जय भवानी’ शिव घोषात दाखल…

vishwatmaklokswamivarta

महाभारतात ‘भीम’ साकारणारे प्रवीण कुमार यांचं निधन, हृदयविकारच्या झटक्याने मालवली प्राणज्योत

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यातील जवळपास 59 आगारांमध्ये संप सुरु आहे. एसटीचं राज्य सरकारी विभाग म्हणून विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागण्यासाठी संप सुरु…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रा मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या ‘या’ भागाला यलो अलर्ट…

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करा

विशेष लेख :उष्माघात टाळा, आरोग्य सांभाळा; प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करा..