vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुण्यातील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त, मातीचा ढिगारा हटविण्याचे काम प्रगतिपथावर; जाणून घ्या पर्यायी वाहतूक मार्ग

पुण्यातील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त, मातीचा ढिगारा हटविण्याचे काम प्रगतिपथावर; जाणून घ्या पर्यायी वाहतूक मार्ग…

 

पुणे येथील चांदणी चौकातील पूल  अखेर पाडण्यात आला. नागरिकांना वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. तुम्ही जर चांदणी चौक मार्गे जाण्याचा विचार करत असाल तर, पर्यायी मार्ग जाणून घ्या….

चुकीच्या शहर नियोजनामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणून पुणे येथील चांदणी चौकातील पूल (Pune Chandni Chowk Bridge Update) अखेर पाडण्यात आला. रविवारी (2 ऑक्टोबर) रात्री 1 वाजून 7 मिनीटांनी हा पूल पाडण्यात आला. प्रशासनाने आगोदरच दिलेल्या माहितीनुसार, पुल पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला. पुल पडताच परिसरात धुळीचे लोट आकाशात उडाले होते. पुढचे काही मिनिटे धुळीचे लोट आकाशात दिसत होते. दरम्यान, धुळ खाली बसली असली तरी मातीचा ढिगारा अद्यापही जागेवरच आहे. तो हटविण्यासाठी काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, नागरिकांना वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. तुम्ही जर चांदणी चौक मार्गे जाण्याचा विचार करत असाल तर, पर्यायी मार्ग जाणून घ्या.

 

    • टोल नाका- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहने थांबवली जातील.

    • खेड शिवापूर टोल नाका- साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने थांबविण्यात येतील.

    • शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी ते उर्से टोल नाका

    • दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंदी

    • डुक्कर खिंड ते घोडावत चौक- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर डुक्कर खिंड ते घोडावत चौक (पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्द) या काळात सर्व बाजूची वाहने वाहतुकीसाठी बंद. (हेही वाचा, Chandni Chowk Bridge Demolished: 1300 छिद्रांमध्ये 600 किलो बारूद भरून अखेर चांदणी चौक पूल जमीनदोस्त, पहा व्हिडीओ)
        • मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या आणि प्रवासी चारचाकी वाहनांसाठी दिलेल्या पर्यायी मार्गानुसार मुंबईच्या दिशेने येणारी हलकी प्रवासी वाहने उर्से टोलनाक्यावरुन पुढील मार्गावरुन प्रवास करु शकतात. नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने.

ट्विट

      • वाकड चौकात आल्यानंतर डाव्या बाजूला वळुन राजीव गांधी पुलावरुन पुढे विद्यापीठ चौक, संचेती चौकाच्या दिशेने वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे आपण साताऱ्याच्या दिशेने जाऊ शकता. शिवाय कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुनही आपण प्रवास करु शकतात.
      • तुम्ही जर राधा चौकाकडे आला असाल तर डावीकडे वळून आपण बाणेर रस्त्यावरुन विद्यापीठ चौकाकडून उजव्या बाजूने संचेती चौकाच्या दिशेने उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याच्या दिशेने अथवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करु शकता.

 

संबंधित पोस्ट

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘सिबील स्कोअर’ची सक्ती करता येणार नाही; राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत वार्षिक पत आराखडा सादर

vishwatmaklokswamivarta

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील नागरिकांनी महा ई-सेवा केंद्रामध्ये आधार, मोबाईल क्रमांकाचे प्रमाणीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजरा

पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता,पार्किंग, वाहतुक बदल व सभेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत

vishwatmaklokswamivarta