vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आज टी२० चषकातील भारतासाठी सर्वाधिक महत्वाचा सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

आज टी२० चषकातील भारतासाठी सर्वाधिक महत्वाचा सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅच..

 

क्रिकेट प्रतिनिधी

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका  मालिका पार पडली. त्यानंतर आता या दोन्ही संघाने टी २० विश्वचषकात  वर्णी लावत विविध संघाविरुध्द उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तरी आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताने यापूर्वी नेदरलॅंड  आणि पाकिस्तान  विरुध्द दणदणीत विजय मिळवला असला तरी आजची लढत भारताचा टी२० चषकातील पुढील प्रवास ठरवणारी आहे. पराभव दोन्ही बाजूंसाठी अंतिम ठरणार नसला तरी, उपांत्य फेरीचा मार्ग सोपा करण्यासाठी विजय महत्वाचा आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यांमध्ये मोठे विजय नोंदवले आहेत.

 

टी२० विश्वचषकातील आतापर्यंत पाऊस किंवा पराभवाचा अनुभव न घेतलेला भारत  हा एकमेव संघ आहे. विराट कोहलीने दिलेला एक तणावपूर्ण विजय,टॉप इलेव्हनमधील (Top 11) विविध ठिकाणांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि भारतीय गोलंदाजांचा परफॉर्मस  हे टीम इंडियाचे वैशिष्ट्य आहे. तरी आजचा सामना कोण जिंकणार याबाबतची उत्सुकता भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघास लागली आहे

संबंधित पोस्ट

जगप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने केले निवृत्तीची घोषणा

आयपीएल 2024 चा 19 वा सामना आज संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR Vs RCB) यांच्यात खेलवला जाणार पाहा काय होणार?

वानखेडे स्टेडीयमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा भव्य पुतळा; बातमीने सचिन झाला भावूक…

vishwatmaklokswamivarta

डिसेंबरमध्ये तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी भारत बांगलादेशला जाणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

स्टार क्रिकेटर दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जाया भारद्वाज अडकले लग्नबेडित; पाहा लग्नाचे काही खास