vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी: मोबाईल तिकीट बुकिंगच्या सेवेत मोठा बदल; अनेक प्रवाशांचा वेळ वाचणार…

मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी मोबाईल तिकीट बुकिंगच्या सेवेत मोठा बदल; अनेक प्रवाशांचा वेळ वाचणार…

 

मुंबई प्रतिनिधी

रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या नव्या सूचनांनुसार, आता प्रत्येक झोन मध्ये 7 नोव्हेंबर पासून हा तिकीट बुकिंगचा नियम लागू असणार आहे.

 

मुंबई लोकल रेल्वे ही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लाईफलाईन समजली जाते. गर्दीच्या वेळेस किंवा घाईत असताना मोबाईल अ‍ॅप, थेट तिकीट काढून लोकल ट्रेन पकडणं याला अनेक प्रवासी आता प्राधान्य देत आहेत. मुंबई लोकलच्या प्रवाशांना आता हीच ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा अजून फायद्याची झाली आहे. पूर्वी 2 किमी अंतराच्या परिघामध्ये तिकीट बूकिंगची असलेली ही सोय आता 5 किमी पर्यंत करत रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. उपनगरामध्ये ही 5 किमी वरून 20 किमी करण्यात आली आहे.

 

त्यामुळे ट्रेन बदलून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा आता वेळ वाचणार आहे.

रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या नव्या सूचनांनुसार, आता प्रत्येक झोन मध्ये 7 नोव्हेंबर पासून हा तिकीट बुकिंगचा नियम लागू असणार आहे. यासाठी अनेकदा प्रवाशांकडून मागणी समोर येत होती. कोणतीही क्षेत्रीय रेल्वे जी 5 किमीचे हे निर्बंध 10 किमीपर्यंत वाढवू इच्छित असेल, त्यांनी CRIS ला इच्छित अंतराच्या निर्बंधाची माहिती द्यावी, असे देखील रेल्वेकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

The UTS mobile app वर प्रवाशांना सीझन तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, मासिक पास, रोजचं तिकीट अशा प्रकारच्या तिकीट बुकिंगची सोय आहे. यामुळे रेल्वे स्थानकांत लांब लचक रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचतो. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड, आयओएस आणि विंडोजच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. हे डाऊनलोड साठी मोफत उपलब्ध आहे. तसेच पेमेंट साठी देखील रेल्वेच्या R- Wallet सोबत PayTM, Mobikwik सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

संबंधित पोस्ट

मुंबईतील धारावी उप पोस्ट ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोईनागरिकांची नाराजगी याच्याकडे लक्ष देणार तरी कोण?

vishwatmaklokswamivarta

धारावी येथील झोपडपट्टीत अचानक पणे भीषण आग; ६ झोपड्या जळून खाक

बालमहोत्सवास सुरुवातसांघिक भावना ठेऊन खेळाचा आनंद घ्याव- कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आगामी काळात अतिवृष्टीत मुंबई डुबली, बुडली हे चित्र दिसणार नाही,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

आयुष्मान भारत कार्ड योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अमंलबजाणी करावी  –जिल्हाधिकारी किशन जावळे

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

vishwatmaklokswamivarta