vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी येथील झोपडपट्टीत अचानक पणे भीषण आग; ६ झोपड्या जळून खाक

धारावी येथील झोपडपट्टीत अचानक पणे भीषण आग; ६ झोपड्या जळून खाक

धारावी येथील झोपडपट्टीत रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत ६ झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. मात्र सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नसून आग काही अवधीतच विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

माहितीनुसार, धारावी, सायन वांद्रे लिंक रोड, श्रीराम बिल्डिंग, सुमित्रा हॉटेल नजीक, मुकुंद नगर येथील झोपडपट्टीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीबाबत माहिती मिळताच नागरिकांनी सदर परिसरात गर्दी केली. काही स्थानिकांनी सुरुवातीला आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, स्थानिकांनी आगीची वर्दी देताच पालिका यंत्रणा, पोलीस, बेस्ट यंत्रणा व अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाने ३ फायर इंजिन व ३ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर काही अवधीतच नियंत्रण मिळविला.

मात्र तोपर्यंत ६ झोपड्या जाळून खाक झाल्या. या झोपड्यातील रहिवाशांना आता आजची रात्र कुटुंबियांसह रस्त्यावरच काढावी लागणार असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आगीवर अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी चौकशी करीत आहेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन,ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद; मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करा

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांची45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्नविठ्ठल घाडगे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड

vishwatmaklokswamivarta

मराठा मावळा संघटनेची जालना येथे बैठक-शासन दरबारी मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाचा संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार…

vishwatmaklokswamivarta

बालमहोत्सवास सुरुवातसांघिक भावना ठेऊन खेळाचा आनंद घ्याव- कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान;गांधेली येथे वृक्ष लागवड कामांची पाहणी