vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार…

­पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार…

      नवी मुंबई प्रतिनिधी-    नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होत असून मतदारांनी कशा पध्दतीने मतदान करायचे याविषयी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये होर्डींग, बॅनर्स, डीजीटल होर्डींग, रिल्स, चित्रफिती, सोशल मिडीया अशा सर्वच माध्यमांव्दारे प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

          यात मनोरंजनातून माहिती व प्रबोधन करणा-या पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमाचाही उपयोग केला जात असून निवडणूकीसाठीच्या ‘मतदार शिक्षण, जागृती आणि साक्षरता कार्यक्रम अर्थात SVEEP’ अंतर्गत मोठ्या प्रमाणात संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात जनजागृती केली जात आहे.

          महानगरपालिका क्षेत्रात दररोज विविध भागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सकाळच्या सत्रात पथनाट्याचे 5 प्रयोग व संध्याकाळच्या सत्रात 5 प्रयोग अशाप्रकारे दिवसामध्ये वेगवेगळया ठिकाणी 10 प्रयोग करण्यात येत असून त्यामधून निवडणूकीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता हसत खेळत आवाहन करण्यात येत आहे तसेच बहुसदस्यीय प्रभागांकरिता करावयाच्या मतदान पध्दतीची माहिती प्रसारित करण्यात येत आहेत.

          या पथनाट्यांना नागरिकांचा ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद लाभत असून सोप्या पध्दतीने बहुसदस्यीय पध्दतीत मतदान कसे करायचे याची माहिती मिळत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

          29 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात बेलापूर विभागात रमाबाई नगर, बेलापूर स्टेशन पूर्व भाग, बेलापूर स्टेशन पश्चिम भाग, डि मार्ट समोरील चौक तसेच संध्याकाळच्या सत्रात सिवूड स्टेशन पश्चिम भाग, येवले चहा समोरील चौक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, करावे तलाव परिसर आणि बेलापूर गाव मुख्य चौक या ठिकाणी निवडणूक विषयक जनजागृतीपर पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले. आजही सकाळपासून नेरुळ विभागामध्ये वेगवेगळया ठिकाणी पथनाट्य करण्यात आली आहेत.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 28 प्रभागांपैकी 1 ते 27 प्रभागांमधील प्रत्येक मतदाराला अ,ब,क,ड अशा 4 जागांसाठी 4 मते द्यावयाची आहेत. तसेच 28 व्या प्रभागात अ,ब,क अशा 3 जागांसाठी 3 मते द्यावयाची आहेत. या मतदानाची पध्दत या पथनाट्यातून सांगितली जात आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा तसेच बहुसदस्यीय प्रभागात मतदान करण्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी याकरिता 13 जानेवारीपर्यंत ठिकठिकाणी नियोजनबध्द रितीने पथनाट्ये आयोजित करण्यात येत आहेत.

संबंधित पोस्ट

महाज्योती’च्या लष्कर, युपीएससी व एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्जांना सुरुवात धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी-असे आवाहन ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केलेले आहे.

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

स्मार्ट गव्हर्नन्स व आदिवासी सशक्तीकरण या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठीकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार- कोकण महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीकोंकण विभागीय आयुक्त कार्यालय व विजयभूमी विद्यापीठ यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार

संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार

जालना शहर महानगरपालिका मार्फत जालना शहरातील दिनांक 07 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या 290 गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत श्री छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंड येथे विसर्जन

vishwatmaklokswamivarta

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta