vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कथित जम्बो कोविड सेंटर प्रकरणी: आज मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल  चहल ईडी कार्यालयात राहणार हजर

कथित जम्बो कोविड सेंटर प्रकरणी: आज मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल  चहल ईडी कार्यालयात राहणार हजर…

 

मुंबई प्रतिनिधी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे

कोरोना संकटकाळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या स्तरावर क्वारंटाईन सेंटर्स आणि कोविड सेंटर्स उभारण्यात आली होती. पण या उभारणीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडी कडून तपास सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणामध्ये मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आज (16 जानेवारी) दिवशी चहल यांना मुंबईतील ईडी कार्यालयात (Mumbai ED Office) हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान काल मीडीयाशी बोलताना चहल यांनी आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही म्हटलं आहे. ईडीने चहल यांना कागदपत्रांसह सकाळी 11 वाजता कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचा आदेश नोटीसीमधून दिला आहे

आझाद मैदान पोलिस स्टेशन मध्ये किरीट सौमय्यांनी तक्रार दाखल केली आहे. सोबतच तक्रारीत संजय राऊतांचे निकटावर्तीय सुजीत पाटकर यांच्या देखील नावाचा समावेश आहे. काही बेनामी कंपन्यांना कंत्राट देऊन चहल यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.

 

संबंधित पोस्ट

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, दगडूशेठची मिरवणूक सुरु, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची घोषणा

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीराजेंवर शिवसेनेने अन्याय केला’, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले 

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्य निमित्त विविध कार्यक्रमांतर्गत देशभरात साजरा करण्याची तयारी भाजपकडून सुरू… हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे.

vishwatmaklokswamivarta

येस बँकेत गुंतवणूक केलीय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी