vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

येस बँकेत गुंतवणूक केलीय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

येस बँकेत गुंतवणूक केलीय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

मुंबई प्रतिनिधी  या शेअर्समधून बाहेर पडताही येत नाही आणि ते ठेवण्याचा कोणताही फायदाही होत नाही. मार्च 2019 पासून येस बँकेच्या शेअर्सच्या स्थितीमुळे गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ (Portfolio) अत्यंत खराब झाला आहे. गेल्या वर्षीपासून येस बँकेशी संबंधित चांगल्या आणि वाईट बातम्या सतत येत आहे. आणि आता जी बातमी आली आहे ती त्याच्या रेटिंगवर आली दरम्यान, इंडिया रेटिंग्सने (India Ratings) येस बँकेची दीर्घकालीन इश्युअर बीबीबी रेटिंग कायम ठेवली आहे. या रेटिंगचा अर्थ असा आहे की Balance Sheet वरील बोजा कमी करण्यासाठी बँकेकडे पुरेसे भांडवल आहे. त्याचबरोबर बँकेच्या डिपॉझिट प्रोफाइलमध्येही सुधारणा होत आहे. येस बँकेचा आउटलूक स्थिर आहे.

येस बँकेचा कॉमन इक्विटी टियर-1 (CET-1) 2022 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 11.6 टक्के होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 13.6 टक्के इतका होता. बँकेकडे 6400 कोटी रुपयांची कर मालमत्ता आहे जी नेटवर्थ काढून CET-1 मधून कमी केला आहे.तरतुदीसाठी (Provisioning) वापरली जाणारी मालमत्ता विकली गेली आहे किंवा काढून टाकण्यात आली असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. एजन्सीचा असा विश्वास आहे की, स्थगित कर मालमत्ता (Deffered Tax Assets) वापरली जाईल ज्यामुळे CET-1 वाढेल.

येस बँकेला (Yes Bank) आपल्या सर्वात मोठ्या भागधारक एसबीआयच्या सोबतीची फायदा होईल. एसबीआय मार्च 2023 पर्यंत येस बँकेत किमान 26 टक्के हिस्सा कायम ठेवायचा आहे. ही बँकेच्या पुनर्रचना योजनेचा (Restructuring Plan) एक भाग आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा (SBI) सध्या येस बँकेत 30 टक्के हिस्सा आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये कर्ज वसुलीमुळे (Loan Recovery) येस बँकेचा नफा वाढू शकतो. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 3400 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.12,000 कोटी रुपयांची घसरण हेच या नुकसानीमागचे मुख्य कारण आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत येस बँकेने ग्रॉस एनपीएवर 67 टक्क्यांहून अधिक तरतूद कायम ठेवली होती. तर अनुत्पादक गुंतवणूकीची तरतूद 90 टक्क्यापेक्षा जास्त आहे.ची मोठी बातमी  :  येस बँकेत गुंतवणूक केलीय..?

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर विभागातील  वेगवेगळ्या स्थानकांवरून आरपीएफ जवानांनी भरकटलेल्या एकाकी ४० मुला-मुलींना शोधून त्यांना स्वकीयांच्या स्वाधीन केले.

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी..

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आचारसंहिता लागू- विधानसभेसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर ला

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विकासप्रकल्पांचा ‘पीएमयू’च्या बैठकीत आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार…