vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कर्नाटक येथील भाजपच्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्याने पुसले PM मोदी यांच्या कटाऊटवरील पावसाचे पाणी पुसले .. गृहमंत्र्यांनी केले कौतुक

 कर्नाटक येथील भाजपच्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्याने पुसले PM मोदी यांच्या कटाऊटवरील पावसाचे पाणी पुसले.. गृहमंत्र्यांनी केले कौतुक

कर्नाटक प्रतिनिधी

कर्नाटक राज्यातील बंगळुरु शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटाऊटवर जमा झालेले पावसाचे पाणी आपल्या गमछ्याने पुसत आहे. सांगितले जात आहे की, हा व्यक्ती भाजप कार्यकर्ता आहे.

 

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 दरम्यान राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान निवडणूकीच्या प्रचारादरम्यान शुक्रवारी जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांचा रोड शो रद्द करावा लागला. गृहमंत्र्यांचा रोड शो रद्द झाला असला तरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ स्वतः अमित शाह यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे

या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट आणि धोतर घातलेला एक वृद्ध पावसामुळे भिजलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कटआउट पुसताना दिसत आहे. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा त्याला विचारले की आपण हे काम पैशासाठी करत आहोत, तेव्हा त्या वृद्धाने आपल्याला काही गरज नसल्याचे उत्तर दिले. त्या व्यक्तीने सांगितले की, मला पैशाची गरज नाही, मी हे फक्त माझ्या प्रेम आणि त्याच्यावरील विश्वासासाठी करत आहे. भावनेच्या भरात त्या वृध्दाने सांगितले की – मोदी आमच्यासाठी देव आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शाह म्हणाले की- कर्नाटकच्या देवनहल्लीचा हा सुंदर व्हिडिओ पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतूट विश्वास आणि त्यांच्याबद्दल निस्वार्थ प्रेम भाजपने कमावले आहे. शाह यांच्याशिवाय कर्नाटकातील भाजपनेही या व्हिडिओवर ट्विट केले आहे.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रम प्रदर्शनाचे आयोजन कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकासाचे नियोजन-वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमअंतर्गतसेवांचा लाभ घ्यावा – उपजिल्हाधिकारी विवेक काळे

vishwatmaklokswamivarta

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू- उद्योग मंत्री उदय सामंत

पेगॅसस हेरगिरीचा मुद्दा, संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.