vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन..

विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन..

 

मुंबई, प्रतिनिधी देशाच्या फाळणीचा इतिहास, भारतीय नागरिकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा विभाजन विभीषिका स्मृती दिन असावा, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार इंडियन बँकतर्फे फाळणीच्या आठवणींचे आणि इतिहासाचे चित्रण एका छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. काळा घोडा येथील इंडियन बँकच्या हेरिटेज इमारतीमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

“आपल्या देशाच्या विभाजनाचा इतिहास हा किती वेदनादायक होता, त्याचा आपल्या लोकांवर काय परिणाम झाला, देशासाठी किती लोक शहीद झाले या सर्व गोष्टींची माहिती नवीन पिढीला व्हावी. म्हणून हे प्रदर्शन महत्वाचे आहे. विभाजनानंतर दहशतवादी हल्ले या सारख्या अनेक समस्यांशी आपण झुंजतो आहोत.” असे मंत्री श्री. लोढा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट पर्यंत खुले राहील.

 

इतिहासाच्या माहितीप्रमाणेच तरुणांचा कौशल्य विकास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, त्या उद्देशाने युवा पिढीसाठी स्वातंत्र्य दिनाची भेट म्हणून शासकीय औद्येगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन होणार असल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले. येत्या ३ महिन्यांत राज्यातील सर्वच आयटीआय व्हर्चुअल क्लासरूम बनवू आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करू, असे देखील त्यांनी सांगितले.

इंडियन बँकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनासाठी एसएसपी रॉय, फील्ड जनरल मॅनेजर, मुंबई, स्वातंत्र्यसैनिक गुणवंती जोशी उपस्थित होत्या.

संध्या गरवारे/विसंअ

संबंधित पोस्ट

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून असल्याचा अभिमान- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम सर्वाना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत २ हजार ३६५ केंद्रांवर परीक्षा संपन्न जिल्ह्यात २५ हजार ९७६ असाक्षर परिक्षार्थींनी दिली परीक्षा

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज-13 जानेवारी रोजी सायं. 5.30 नंतर कोणत्याही प्रकारे प्रचार केला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश….

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर मुंबईत खड्ड्यांचा मुद्दा , भाजपा,मनसे सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न.

vishwatmaklokswamivarta