vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न…

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न…

 

मुंबई प्रतिनिधी

 30 वर्षांपासून खेळ, क्रीडा, मनोरंजन, योगाभ्यास चालणे, महिन्याच्या शेवटच्या रविवारी एकत्रित वाढदिवस साजरे करणे, नियमित व्यायाम, पावसाळी सहल, स्नेहसंमेलन, विशेष कार्यक्रम अशा विविध उपक्रमांची वर्षभर सुरळीत पणे आयोजन करणारी अरुणोदय वॉकर्स असोसिएशन, बांद्रा पूर्व व इतर विभागात कार्यरत असणारी, या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या, संस्थेची तीसावी वार्षिक सर्व सभा रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 सकाळी आठ ते दहा या वेळात कलानगर सभागृहात सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात सभा संपन्न झाली.

राष्ट्रगीताच्या सामुहिक गायनाने सभेची सुरुवात झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सौ. अंजली रिसबुड होत्या. आलेल्या पाहुण्यांचे व सभासदांचे सौ.शैलजा सोमानी यांनी स्वागत केले.
संस्थेचे सचिव श्री. किरण भोगले यांनी सन 2021-22 मधील वार्षिक सभेच्या वृत्तांताचे वाचन करून दाखविले तर सन 2022-23 हिशोबाचे वाचन खजिनदार सौ.शिल्पा शिरोळे यांनी करून दाखविले तसेच काही शंका, प्रश्न आणि सूचना आल्या त्यांना कार्यकारिणी सदस्यांनी समाधान कारक
उत्तरे देऊन त्यांचं निराकरण केले.
सर्वच ठराव व पुढील वर्षाचे नियोजन बहुमताने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी सहसचिव श्री.दिलीप गाडेकर यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे आभार मानले.
सभेच्या शेवटी काहीं सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. त्यावेळी श्रीमती भारती पोळ,, श्री. मोहन साळवी आणि इतर अनेक सभासदांचे सहकार्य लाभले. अल्पोपहार करून सभा समाप्त झाली.

 

संबंधित पोस्ट

मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना मिळणार‘आयआयटी’ बॉम्बेचे मार्गदर्शन सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी राज्य शासन व ‘आयआयटी’ बॉम्बेमध्ये सामंजस्य करार

मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने आता विरोधकांचे तोंड बंद होईल –केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले,नवीन मंत्रिमंडळाचे रिपब्लिकन पक्षातर्फे स्वागत  

मुंबईत ₹122 कोटींची बँक फसवणूक – बँकेच्या महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल!

vishwatmaklokswamivarta

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta