vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार*    *- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार*    *- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

 

 

 

सातारा प्रतिनिधी: महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गाव मध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन घेणाऱ्या गावांची माहिती उपलब्ध करावी त्या गावाने उत्पादित केलेल्या मालाची ओळख देवून तेथील उत्पादनवाढ व सोयी-सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध उपलब्ध करुन जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

 

 

 

कृषि क्षेत्रातील नाविण्यपूर्ण गावातील सरपंच व शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांचा एक आराखडा तयार करावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, यासाठी कृषि विभाग व खादी ग्रामद्योग विभागाने मदत करावी. आराखड्यातील गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करु दिला जाईल. त्याचबरोबर पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जातील, यासाठी गावातील प्रत्येक घटकाने योगदान देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

 

मधासाठी मांघर, स्टॉबेरीसाठी भिलार, रेशिम शेतीसाठी पळशी, नाचणीसाठी कुसुंबी, ज्वारीसाठी इंजबाव, मटकीसाठी शिरवली, हळदीसाठी शहाबाद व फळ उत्पादनासाठी धुमाळवाडी ही गावे प्रसिद्ध आहेत. या गावांच्या कृषि उत्पादनवाढीसाठी मदत, प्रक्रिया प्रशिक्षण, मालाला ब्रॅडींग व बाजारपेठ पर्यटनवाढीसाठी काम केले जाईल. प्रत्येक तालुक्यातील एक गाव तरी तयार करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.

 

0000

संबंधित पोस्ट

सैनिकांसाठी महसूल दिवसाचे आयोजन

ध्वजदिन निधीसाठी रुपये 5 लाख मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सूपूर्द

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

वसगडे ते नागाव, निमणी दरम्यान13 ते 27 ऑक्टोबर कालावधीत वाहतूक नियमन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दुधाला प्रतिलिटर 35 रुपये दर देण्याचे-मंत्री विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta