vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पिक विमा योजनेत संत्रा व रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्यास मुदतवाढ…

पिक विमा योजनेत संत्रा व रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्यास मुदतवाढ…

 

 

 जालना प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील पिकविमा योजना अंतर्गत 2023-24 मध्ये संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दि. 30 नोव्हेंबर 2023 होता मात्र पिक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी उध्दभवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टीकोनातून जिल्‌ह्यातील संत्रा या फळपिकासाठी व रब्बी हंगामातील ज्वारी या पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याकरीता दि.5 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ केली आहे.

 

विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील फळपिक व रब्बी ज्वारी या पिकांसाठी 5 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात. याचा जिल्ह्यातील संत्रा व रब्बी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभगामार्फत करण्यात येत आहे. तरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दि. 15 डिसेंबर 2023 असा आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

 

वृत्त क्र.766

संबंधित पोस्ट

सत्याचा झाला विजय.आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी भाजपवर साधला निशाणा….

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

vishwatmaklokswamivarta

शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह-अन्य मंदिरांमधूनही मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवा ! – हिंदु जनजागृती समिती

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी- मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण,वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा पासिंग आऊट व दिक्षांत समारंभ संपन्न

विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार संत्रा उत्पादकांना मोठा फायदा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात ,  12 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी..