vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात ,  12 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी..

खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात ,  12 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी…

 

खोपोली प्रतिनिधी

आताची सर्वात मोठी बातमी…जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 29 जण जखमी आहेत.

बोरघाटातल्या शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. ही खासगी बस पुण्याहून मुंबईला येत होती. तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली.

बचावपथक घटनास्थळी दाखल झालं असून दुर्घटनेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

 

बाजी प्रभू झांज पथक बसमध्ये

मुंबईच्या गोरेगावमधलं बाजी प्रभू झांज पथक या बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.. पुण्याचा कार्यक्रम आटोपून हे पथक मुंबईकडे निघालं होतं… तेव्हा हा अपघात झाला.

 

शिवशाही बसचा भीषण अपघात

दरम्यान शुक्रवारी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाबा पेट्रोल पंपावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 14 जण जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बस नाशिकमधील होती. जेव्हा ही बस छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून निघाल्यानंतर बाबा पेट्रोल पंपाजवळ बस चालकाचा नियंत्रण सुटला आणि बस एका कंटेनरला जाऊन धडकली.

संबंधित पोस्ट

राहुल गांधी यांची संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका..

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण !

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील सर्वात दुर्दैवी घटना: औरंगाबाद हादरलं! दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने घेतला गळफास, आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल…

विकासाच्या ‘इकोसिस्टीम’मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य…

इस्रायलच्याविमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. या आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावले.

vishwatmaklokswamivarta

मुंबईत दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात..