vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात..

मुंबईत दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात..

प्रतिनिधी  : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत पुन्हा लसीकरणाला (COVID-19 vaccination) सुरुवात झाली झाली आहे. काल राज्याला 21 लाख लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा प्रत्येक केंद्रावर वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईकर लसीकरणासाठी जाऊ शकतात.

लसीच्या डोसच्या कमतरतेमुळे दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत शनिवारी (21 ऑगस्ट, 2021) महापालिकेने आपली कोविड -19 लसीकरण मोहीम पुन्हा सुरू केली आहे. गुरुवारी रात्री 1,60,000 पेक्षा जास्त डोस मिळाल्यानंतर शहरात कोरोनाव्हायरस लस देणे सुरु झाले आहे. ही लस शुक्रवारी सर्व सरकारी आणि नगरपालिका लसीकरण केंद्रांमध्ये वितरित आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या मते, कोविशील्डचे 1,50,000 डोस आणि कोवॅक्सिनचे 10,240 डोस मिळाले आहेत. बीएमसीने मुंबईतील कोविड लसीकरण केंद्रांची (सीव्हीसी) यादी शेअर केली आहे यानुसार शनिवारी लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी 4,365 नवीन कोविड -19 रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी मुंबईत 322 संक्रमणाची नोंद झाली आहे. राजधानीची सक्रिय संख्या आता 2,853 झाली आहे, तर राज्यात ती 55,454 आहे.

संबंधित पोस्ट

आरटीई” प्रवेशासाठी पालकांनीकोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई-शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी

vishwatmaklokswamivarta

विशेष लेखः-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना

मनुस्मृतीचा श्लोक वेळीच शिकवला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*

बल्लारपूर बायपास अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० लाखांची मदत

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर,बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार,बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी कोंडवाडे बांधण्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करा -उपमुख्यमंत्री