vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तालिबान्यांची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत करणाऱ्या,त्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या त्या मुनव्वर राणा वर गुन्हा दाखल.

तालिबानची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत, मुनव्वर राणांविरोधात गुन्हा,तालिबान्यांची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत केली आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या त्याला अटक करा

 

प्रतिनिधी  लखनऊ  कुप्रसिद्ध  शायर मुनव्वर राणा यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर मांडलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. राणा यांनी तालिबानची तुलना महर्षी वाल्मिकी ऋषींसोबत केली होती. यावर वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी मुनव्वर राणा यांच्याविरोधात जळगाव, लखनऊमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

लखनऊमधील हजरतगंज कोतवाली पोलिस स्थानकात मुनव्वर राणा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वाल्मिकी समाजाचे नेता पीएल भारती यांनी तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस आधिकारी श्याम शुक्ला यांनी सांगितले की, पीएल भारती यांनी आपल्या तक्रारीत मुनव्वर राणा यांनी तालिबान्यांची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत केली आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच त्यांचा आपमान झाला आहे.

जळगावमध्येही गुन्हा-प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी एका मुलाखतीत आफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले होते. त्यामध्ये त्यांनी बोलताना महर्षी वाल्मिक ऋषीं यांचा अनुल्लेख केला होता. त्याप्रकरणी राणा यांच्या विरोधात जळगावमधील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे  नगरसेवक कैलास सोनवणे यांनी ही तक्रार दिली आहे. त्यानुसार शनी पेठ पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम २९८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका मांडताना मुनव्वर राणा यांनी व्यक्त केलेल्या मतावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तालिबान्यांनी गेली २० वर्ष अन्याय सहन केला आहे. त्यामुळे आता सत्ता आल्यावर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी तो साजरा केला, तर त्याच आपल्याला त्रास व्हायला नको, असेही राणा म्हणाले होते.

संबंधित पोस्ट

मिशन महाग्राम’अंतर्गत शिक्षण कार्यशाळा,शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान शिक्षणाचेच- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नवी मुंबई महानगरपालिका* बेगर निराशीत नागरिकांसाठी नवी मुंबईत घणसोली येथे बेघर निवारा केंद्र कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजप पराभवाच्या छायेत, निकालाबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षकतीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी