vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील बोरिवलीत रिपब्लिकन पक्षाचे उत्तर भारतीय संमेलन होणार..

 मुंबईतील बोरिवलीत रिपब्लिकन पक्षाचे उत्तर भारतीय संमेलन होणार..

 

मुंबई प्रतिनिधी: मुंबई- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपल्लिकन पक्षाने उत्तर भारतीयांना त्यांच्या अडी अडचणीत नेहमीच साथ दिली आहे. मग, ते फेरीवाले असो, टॅक्सीवाले असो, कष्टकरी कामगार असो वा त्यांच्या घरांच्या समस्येचा प्रश्न असो त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उत्तर भारतीयांचा त्यांच्या सह पक्षावर प्रचंड विश्वास आहे. त्या विश्वासाच्या नात्यामुळे उत्तर भारतीयांना रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेत सामावून घेऊन येत्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षातर्फे उत्तर भारतीयांना उमेदवारी देण्याचे धोरण पक्षातर्फे निश्चित केल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली. त्यावेळेस त्याच्या समवेत रिपाईचे उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट् प्रदेश अध्यक्ष श्यामधर दुबे . मुंबई अध्यक्ष हरिहर यादव ‘ उत्तर भारतीय आघाडीचे राज्य सरचिटणीस रमेश गौड हे ही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित ८ जानेवारीला मुंबईतील बोरिवलीत रिपब्लिकन पक्षाचे उत्तर भारतीय संमेलन होणार असल्याचे त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळेस महाराष्ट्रात जेंव्हा जेंव्हा परप्रांतीयांच्या मुद्यावर उत्तर भारतीयांशी भेदभाव, अन्याय, दहशतीचा, संकटाचा प्रसंग आला तेंव्हा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाने पुढे येऊन उत्तर भारतीयांना जाहिर पाठिंबा दिला आहे त्यांमुळेच त्यांच्या नेतृत्त्वावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीय नागरिक येत्या जानेवारी २०२४ रोजी उत्तर भारतीय संमेलनात उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणार आहोत अशी माहिती रिपाईचे उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्याम धर दुबे, मुंबई अध्यक्ष हरिहर यादव ‘ उत्तर भारतीय आघाडीचे राज्य सरचिटणीस रमेश गौड यांनी दिली आहे

यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मुंबई अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे म्युनिसिपल मजदूर संघाचे सचिव प्रकाश कदम, रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे सरचिटणीस शिरिष चिखलकर , कुलाबा विधानसभा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड , रिपाई कार्यालयीन सचिव दादासाहेब जाधव आणि उत्तर भारतीय आघाडीचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय,मदत कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न..

केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांचे उमेदवार स्नेहा सिद्धार्थ कसारे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन धुवाधार प्रचार सुरू विरोधकांची हवा उडाली…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील – चेंबुरमध्ये दरड कोसळली, दोनजण गंभीर जखमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

रेल्वेची विशेष माहिती: गर्दी रोखण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, या तिकीट दरात होणार वाढ

vishwatmaklokswamivarta