vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञान

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३ दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३ दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

 

            मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट – ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ४९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मुळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

 

या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भूषण निवृत्ती लांडगे हे अराखीव व मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला अराखीव गटातून सांगली जिल्ह्यातील गितांजली रविंद्रनाथ कोळेकर राज्यात प्रथम आल्या आहेत.

 

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

 

हा अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना पाहवे असे आयोगाने कळविले आहे.

 

 

 

0000000

संबंधित पोस्ट

गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ

vishwatmaklokswamivarta

अनधिकृत बांधकामांवर  मुंबई पालिकेने  युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांचा BMC ला महत्त्वाचा आदेश.

vishwatmaklokswamivarta

महिलांना आर्थिक साक्षर करणे महत्वाचे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने‘जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी’ कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस आता कारवाई करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

शिक्षणमंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर राजश्री उंबरे यांचे उपोषण स्थगित…

vishwatmaklokswamivarta

बांठिया आयोग अहवालानुसार निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ओबीसी आरक्षण निर्णायक दिशेने…

vishwatmaklokswamivarta