vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणूक निरीक्षकांकडून मतमोजणी परिसराची पाहणी..

निवडणूक निरीक्षकांकडून मतमोजणी परिसराची पाहणी..

 

बुलडाणा, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बुलडाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. या परिसराची पाहणी निवडणूक सामान्य निरीक्षक पी. जे. भागदेव यांनी केली.

 

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

 

निवडणूक निरीक्षक श्री. भागदेव यांनी मतदानानंतर मतदान यंत्रासह आदी साहित्य ठेवण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. मतदानानंतर याठिकाणी रात्री उशिरा मतदान यंत्रासह इतर साहित्य येणार आहे. त्यामुळे पुरेशी प्रकाशाची सोय करण्यात यावी. तसेच संपूर्ण साहित्य ठेवण्यात आल्यानंतर प्रत्येक खोली सिल करण्यात यावी. सुरक्षेसाठी सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्यात आले आहे. याचे नियंत्रण योग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट मशिनवरील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुकर प्रवेश देण्यात यावा. मतमोजणीसाठी विधानसभा संघनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी उमेदवार, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी. मतदान यंत्र स्ट्राँग रूममधून आणणे आणि परत नेण्यासाठी वेगळी मार्गीका तयार करावी. तसेच मतपत्रिका, सर्व्हीस वोटरची मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना श्री. भागदेव यांनी केल्या.

 

00000

संबंधित पोस्ट

चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे 2025 दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई

vishwatmaklokswamivarta

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 नोव्हेंबरला भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण व**वारस नोंद करुन घेण्यासाठी मुदतवाढ*

vishwatmaklokswamivarta

श्री सिद्धिविनायक मंदिरात  ‘माघी गणेश जयंती महोत्सवा’ची सुरुवात; गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर भव्य सोहळा..

vishwatmaklokswamivarta