vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातूनघरोघरी मतदान जनजागृती

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातूनघरोघरी मतदान जनजागृती

 

ठाणे, प्रतिनिधी:- लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप पथकाच्या वतीने शहरातील ‍ विविध घटकांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे. 100 टक्के नागरिकांनी मतदान करावे, यासाठी ठाण्यातील सर्व पोस्ट कार्यालयातील कर्मचारीदेखील टपाल देण्याच्या माध्यमातून घरोघरी जावून मतदानाबाबत जनजागृती करीत आहेत.

 

25-ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’अंतर्गत ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस येथे घोषवाक्याद्वारे घोषणा, मतदान करण्याबाबत शपथ आणि मतदार जनजगृती विषयक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

पोस्ट ऑफिस येथील कर्मचारी वर्गाला व पोस्ट ऑफिस मध्ये येणाऱ्या ग्राहक वर्गाला मतदानाचे महत्व कळावे व मतदारांनी मतदानास चांगला प्रतिसाद द्यावा, याकरिता मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. ‘मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे’. निवडणूक कोणतीही असो, या निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा,असे यावेळी स्वीप टिम कडून सांगण्यात आले.

 

मतदारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी युवा मतदार, कर्मचारी, ग्राहकवर्ग, महिला यांनी उत्साहाने या स्वीप मध्ये सहभागी होऊन घोषणा व माहिती फलकाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी विशेष सुविधा दिलेली असल्याने उपस्थितांनी सेल्फी घेऊन मतदार करण्याचा संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतरांना दिला.

 

20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 100 टक्के मतदान व्हावे, यासाठी डाक विभागाच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच डाक विभागाचे पोस्टमन, कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाबद्दल जागरुक केले जात आहे. सर्व टपाल कार्यालयामध्ये मतदानाबद्दल नागरिकांना जागरुक करण्यासाठी बॅनर्स, सेल्फी बूथ लावण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना मतदानाविषयी जागरूकता येईल.

 

0000

संबंधित पोस्ट

नवरात्री, दिवाळी आणि छट पूजा या सणांच्या काळात सर्वांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार, भारतीय रेल्वे 519 विशेष ट्रेन चालवणार…

vishwatmaklokswamivarta

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

कोविड महामारीचा  सामना करण्यासाठी कोरोनानंतर मुंबई महापालिका रुग्णालये होणार आणखी सुसज्ज

vishwatmaklokswamivarta

मुंबईत रविवारचा मेगा ब्लॉक, विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकात थांबा नाही

vishwatmaklokswamivarta

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी

vishwatmaklokswamivarta