vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एक रुपयात पिक विमा योजना’;सेवा केंद्र चालकांनी अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार करण्याचे आवाहन

 एक रुपयात पिक विमा योजना’;सेवा केंद्र चालकांनी अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी लाभ घेतला. खरीप २०२४ मध्ये ३० जून पर्यंत ४० लाख विमा अर्ज नोंद झाली आहे, तरी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. सेवा केंद्रचालकांनी एक रुपयांपेक्षा अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार करावी, असे आवाहन कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

 

विमा अर्जाबाबत महत्वाची माहितीः-

 

· प्रधानमंत्री पिक विमा योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति विमा अर्ज रुपये एक प्रमाणे योजनेतील सहभाग शासनाने देऊ केला आहे.

 

· विमा योजनेमध्ये सहभागासाठी पर्यायः-

 

o शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर ऑनलाईन अर्ज भरू शकता.

 

o शेतकऱ्यांचे ज्या बँकेमध्ये खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन विमा अर्ज भरता येतो.

 

o कर्जदार शेतकऱ्यांनी विमा मुदत संपायच्या किमान सात दिवस आधी विमा योजनेत सहभाग घ्यायचा असल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेस कळविल्यास त्या संस्थेमार्फत त्यांचा विमा हप्ता जमा करुन त्यांना सहभागी करुन घेण्यात येते.

 

o केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभाग घेऊ शकतो.

 

o सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो.

 

o सीएससी केंद्र चालकांना प्रति शेतकरी ४० रुपये प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. हे शुल्क संबंधित विमा कंपनी ही सीएससी यांना अदा करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क सीएससी चालक घेऊ शकत नाहीत.

 

o मात्र शेतकऱ्यांनी ७/१२, ८-अ स्वत: काढून दिला पाहिजे. किंवा शासकीय शुल्क भरून online प्राप्त करून घ्यावा.

 

एक रुपयापेक्षा अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार कराः-

 

राज्यात काही ठिकाणी काही सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्याकडून प्रति अर्ज रुपये एक पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत . याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल.

 

· विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे ?

 

§ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक , आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत

: पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.

 

§ योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत दि. १५ जुलै २०२४ आहे.

 

§ योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७ संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

जळगांव, यवतमाळ जिल्ह्यातील सूतगिरणींना सहाय्य…

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते**मुरबाडमधील ‘जनसंवाद’ कार्यक्रमात विविध शासकीय लाभांचे वाटप*

अनुसूचित जाती (sc) प्रवर्गासाठीचे 18 दिवसीय निवासी उद्योजकीय प्रशिक्षणाचे समारोप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी इच्छूकांनी अर्ज सादर करावेत  -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते

vishwatmaklokswamivarta

मौजपुरी येथील जि .प. प्राथमिक विद्यालयात भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते वह्यांचे वाटप*