vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते**मुरबाडमधील ‘जनसंवाद’ कार्यक्रमात विविध शासकीय लाभांचे वाटप*

विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते**मुरबाडमधील ‘जनसंवाद’ कार्यक्रमात विविध शासकीय लाभांचे वाटप*

 

ठाणे, प्रतिनिधी

: कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मुरबाड येथे महसूल सप्ताहांतर्गत “जनसंवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ, प्रमाणपत्रे व सलोखा योजनेचे आदेश वनपट्ट्याचे आदेश वितरित करण्यात आले.

महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात आज ‘जनसंवाद’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम मुरबाडमधील एम.आय.डी.सी. हॉल येथे विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण चे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील, ठाण्याचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे, मुरबाड चे तहसिलदार संदीप आवारी तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये स्थानिक महसूल,कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन ॲप द्वारे करावयाचे पीक पाहणी संदर्भात प्रशिक्षण व सादरीकरण करण्यात आले.

यावेळी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सलोखा योजनेंतर्गंत लाभार्थीना मान्यवरांच्या हस्ते आदेश प्रदान करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने अनुदान वाटप, पुरवठा विभागामार्फत अन्न प्रमाणपत्र व ई-रेशनकार्ड वितरण, संजय गांधी योजनेंतर्गत लाभ मंजूरी आदेश, वनहक्क दाव्यांतर्गत शेतकऱ्यांना वन पट्टे आदेश वितरण, नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमी लेअर चे दाखले वाटप करण्यात आले.

*विविध तालुक्यातही “जनसंवाद” कार्यक्रमांचे आयोजन*

विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर व जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड येथील मुख्य कार्यक्रमाबरोबरच ठाणे जिल्हयामध्ये प्रत्येक तहसिलदार कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय स्तरावर महसूल अदालत, सलोखा योजना, जमीनविषयक नोंदीबाबत प्राप्त अर्ज निकाली काढणे तसेच आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलवर तक्रारींची दखल घेऊन त्यावर देखील कार्यवाही करण्यात आली.

जिल्ह्यातील तालुका स्तरावर विविध ठिकाणी आयोजित महसूल अदालतींनाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

00000000

संबंधित पोस्ट

पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शना येणारा भाविकांच्या बसचा भीषण अपघात…

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाभारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठक रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ बसविणे अनिवार्य; १ डिसेंबरपासून होणार कारवाई…

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या गुरुग्राममधील  गोल्फ कोर्स रोडवर कार अपघात, तब्बल 2 कोटी रुपयांची पोर्श कार  जळून खाक..

vishwatmaklokswamivarta

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta