
भारतीय जनता पार्टीने देशभरात सदस्यता मोहीम,सदस्यत्व मोहिमेने इतिहास रचला, 3 दिवसात 1 कोटीचा आकडा पार… भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे
राज्य प्रतिनिधी
2 सप्टेंबर पासून देशामध्ये भारतीय जनता पार्टी यांनी सदस्यता अभियान राबविण्याची सुरुवात केली भाजप कार्यकर्त्यांना आणि जनतेला 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा नमो ॲपद्वारे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले. त्यांना भरघोस प्रतिसाद मिळू लागला या तीन दिवसातच सदस्यता मोहिमेने इतिहास रचला आहे एक कोटी आकडा पार केला अशी माहिती ट्विटरवर विनोद तावडे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांनी दिली
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाचे समन्वयक विनोद तावडे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाने इतिहास रचला असून अवघ्या १५ दिवसांत १ कोटीचा आकडा पार केल्याचा दावा केला आहे. विनोद तावडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हणाले, “भाजप सदस्यत्व मोहिमेने इतिहास रचला, 3 दिवसात 1 कोटीचा आकडा पार केला.” तावडे पुढे म्हणाले, “2 सप्टेंबरपासून सुरू झालेला संघ पर्व सदस्यत्व अभियान-2024 मध्ये अवघ्या 3 दिवसांत 1 कोटींहून अधिक सदस्य सामील झाले आहेत, हा एक विक्रमच आहे.



