vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सामाजिक न्याय विभागामार्फत आज26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

सामाजिक न्याय विभागामार्फत आज26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

 

      राज्य प्रतिनिधी   सांगली,: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाची जागरूकता वाढविणेकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस.टी. स्टॅन्ड, परिसर सांगली येथे सकाळी 8.30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करणे, संविधान उद्देशिकेचे वाचन करणे व बाईक रॅली हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत प्रतिवर्षी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यनिमित्त सन 2024-25 या अमृत महोत्सवी वर्षात “घर घर संविधान” हा उपक्रम साजरा केला जात आहे. यानिमित्त वरीलप्रमाणे उपक्रमांचे आयोजन केले आहे.    बाईक रॅलीचा मार्ग एस.टी.स्टँड परिसर सांगली- छ.शिवाजी महाराज पुतळा मार्गे- स्टेशन चौक- जिल्हाधिकारी निवास सांगली- आमराई उद्यान समोरून- कॉलेज कॉर्नर- माधवनगर सर्किट हाऊस मार्गे- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड सांगली येथे रॅलीची सांगता असा आहे. तसेच समाजकल्याण विभागाच्या सामाजिक न्याय सभागृहात सकाळी 11.00 वाजता प्रा. प्रज्ञावंत कांबळे यांचे संविधानविषयक व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

  तरी सदर दिवशी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास अभिवादन, संविधान उद्देशिकेचे वाचन तसेच बाईक रॅलीकरिता सांगली जिल्ह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी सांगली एस. टी. स्टँड परिसरातील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक या ठिकाणी दुचाकीसह उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठकाजिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही  – मंत्री मंगलप्रभात लोढा* रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

डिजीटल होर्डींग, सोशल मिडीया, सेल्फी बूथ अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

बातम्याप्रसारण मंत्रालयाकडून 22 YouTube चॅनल ब्लॉक, भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध यांबाबत चुकीचे वृत्त दिल्याने कारवाई

भराडी देवीच्या  दरबारात भरला दैदिप्तमान सोहळा ,विटू नामाचा जागर- माईगडेवाडी*उपवास करणाऱ्या *महिलांसाठी संस्थेच्या वतीने साडी, ब्लॅंकेट व फराळाचे वाटप…

vishwatmaklokswamivarta