vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद

बुलढाणा प्रतिनिधी : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. हे काम 8 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत 15 टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या कामासाठी बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या 296 किमी ते 502.752 किमी या दरम्यान गॅन्ट्री उभारण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यांमधून तसेच जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमधून जाणाऱ्या मार्गावर हे काम होणार आहे.

गॅन्ट्री बसविण्याच्या कामादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक सुमारे 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश…

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना;दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शेगांव तालुक्यातील अवसायनातील आठ संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta