vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे सीवाय टिबी टेस्ट या मोहिमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते उद्घाटन..

प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे सीवाय टिबी टेस्ट या मोहिमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते उद्घाटन..

 

 ठाणे प्रतिनिधी, (जिल्हा परिषद ठाणे)- प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत दि. 4 डिसेंबर, 2024 रोजी सुप्त अवस्थेतील क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान होण्यासाठी सीवाय टिबी (CY TB) टेस्ट या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या चाचणी मुळे जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांचे खात्रीपूर्वक निदान करून क्षयरोगातून पूर्ण बरे करण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

 यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके, डॉ. अर्चना मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ डॉ. प्रशांत कनोजा, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र बदलापूर डॉ. अश्विनी वाणे, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र बदलापूर डॉ. केतकी गायकवाड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आशा स्वयंसेविका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर संजीवनी पाटील यांनी रेखाटलेली आरोग्य शिक्षणपर रांगोळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

000

संबंधित पोस्ट

आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाची तयारी व अभ्यासात सातत्य ठेवा, यश हमखास मिळेल,कौतुक सोहळा : आमदार नारायण कुचे यांचा इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सल्ला…

मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ-८ मध्ये जप्त केलेली ६८,३८,६३५ रुपयांची मालमत्ता मालकांना परत करण्यात आली.

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त अवयवदान जनजागृती

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ‘जालना ग्रंथोत्सव 2024’ चे उद्घाटन

नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण स्थगित करा-आमदार सुधाकर अडबाले : विधानसभा निवडणुकीनंतर घेण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास राज्यभर आंदोलन छेडणार -माजी खासदार हरिभाऊ राठोड   

vishwatmaklokswamivarta