vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

 

बुलढाणा, प्रतिनिधी अलिकडच्या काळात देशाची तरूण पिढी वाचन संस्कृतीपासुन दुरावत असल्याचे दिसत आहे. या पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम विद्यापिठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालय तसेच शासकीय ग्रंथालय यांच्या माध्यमातून दि.१ ते १५ जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे ग्रंथप्रदर्शन, सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्येही वाचन पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

 जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथील ग्रंथालयामध्ये आजमितीस सुमारे 1 लक्ष 60 हजार ग्रंथसंपदा उपलब्ध असून त्यामध्ये मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील विविधांगी कथासंग्रह, कादंबरी, संदर्भग्रंथ, ललित वाड:मय, स्पर्धा परीक्षा ग्रंथ इत्यादी ग्रंथसंपदा उपलब्ध असून वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमामध्ये जास्तीतजास्त वाचकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे. 000000

संबंधित पोस्ट

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 🌧️ कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर – पंचगंगा नदी पात्राबाहेर!

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री…

एसटी महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

जिल्ह्यातील अनेकांनी भिकन रोजेकर यांचा आदर्श घ्यावा: आमदार नारायण कुचे