vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबई प्रतिनिधी : राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री श्री. भोसले म्हणाले की, राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री श्री. भोसले यांनी केला.

संबंधित पोस्ट

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतरांगेत नुकत्याच झालेल्या ६.० किंवा ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे २५०० हून अधिक लोक जखमी

vishwatmaklokswamivarta

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना..