vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी

जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी केली.      उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार सारंग चव्हाण, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे व कनिष्ठ अभियंता तुषार विसपुते तसेच पैठण उद्यान विकास समितीचे विजय सुते, रमेश लिंबोरे, बाळु आहेर, संतोष गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.

    पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास व सुशोभिकरणाचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पर्यटकांना खुले करण्याच्या दृष्टिने कामाची प्रगती पाहण्यासाठी आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज उद्यानास भेट दिली. सुरु असलेले कामकाज तसेच या कामासंदर्भात प्रस्तावित आराखड्यातील तरतूदी याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. येथे आल्यानंतर पर्यटकांना आल्हाददायक वाटायला हवे,असेही त्यांनी सांगितले.०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta

खाजगी विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज सुरू 

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

vishwatmaklokswamivarta