vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत जिल्हास्तरीय फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न-मुलांच्या गटात जिल्हा परीषद नेर तर मुलींच्या गटात कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय बदनापुर अजिंक्य

खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत जिल्हास्तरीय फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न-मुलांच्या गटात जिल्हा परीषद नेर तर मुलींच्या गटात कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय बदनापुर अजिंक्य

जालना/प्रतिनीधी – माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक व फेंटबाल असोसिएशन ऑफ इंडीयाचे अध्यक्ष खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत तिसर्‍या जिल्हास्तरीय फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धा अभुतपुर्व प्रतिसाद व प्रचंड उत्साहात संपन्न झाल्या

स्पर्धेचे उदघाटन खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भास्कररावजी अंबेकर, विशेष उपस्थिती मध्ये कॉग्रेसचे महानगर अध्यक्ष शेख महेमुद, गणपती एज्युकेशन कॅम्पस राजुरचे ज्ञानेश्‍वर पुंगळे, देवगीरी इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, माजी नगरसेवक जयंतराजे भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे, माजी नगरसेवक बाला परदेसी, समाजसेवक शेख ईब्राहीम, प्रा.डॉ. बप्पासाहेब म्हस्के यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य जवाहर काबरा, डॉ. पोकळे साहेब, राजेंद्र परदेशी, अभय सेठ सहानी, शामभाऊ जवादे, ओमप्रकाश दायमा, संजय ठाकुर, अमोल ठाकुर युवा सेना जिल्हाध्यक्ष, मोहन इंगळे, सदाशीव वाघ, तुकाराम काकडे मु.अ. जि.प. प्रशाला नेर, प्रा. गायत्री सोरटी यांची उपस्थिती होतीे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन शेख चाँद पी.जे. यांनी केले.

स्पर्धेस जिल्हाभरातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला यात सोळा शाळा व दोन स्पोर्टस क्लबचे 306 खेळाडु सहभागी झाले होते, यामध्ये प्रामुख्याने अंबड, बदनापुर, घनसावंगी, परतुर तसेच जालना शहर व जालना तालुक्यातील खेळाडुंचा सहभाग होता.

स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ कामगीरी करत ओव्हर ऑल चॅम्पीयनशीपमध्ये मुली – प्रथम – कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय, बदनापुर 24 गुण, द्वितीय – जालना स्पोर्टस क्लब, जालना 11 गुण, तृतीय – मत्स्योदरी विद्यालय, अंबड 6 गुण, मुले – प्रथम -जिल्हा परीषद प्रशाला नेर ता. जालना 26 गुण, द्वितीय – जालना स्पोर्टस क्लब, जालना 14 गुण, तृतीय – जिल्हा परीषद प्राथमीक शाळा, बोरी ता. अंबड 8 गुण या शाळांनी यश संपादन केले.

स्पर्धेत पंच म्हणुन उमेशचंद्र खंदारकर, तुषार गर्जे, अमोल सातपुते, सुरेश त्रीभुवन, प्रविण जाधव, अमोल काटकर, संतोष वाघ, शेख समीर, सोहेल खान, शेख सरताज, वेदांत सोरटी, आर्यन जाधव यांनी काम पाहीले, तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समीतीचे अध्यक्ष शेख अहेमद, श्रीमती शेख महेजबीन, श्रीमती गिता वड्डापेल्ली, श्रीमती करूणा निरेवाड, सतीष गाभुड, सुभाष पारे, सुरेश सावंत, नितीन जाधव, अमोल सोलाट, विजय सदावर्ते, सतीष घारे, राजेश शेवाळे, शेख ईस्माईल, झाल्टे सर, गोपाल सर, ढगे सर, लांडगे सर, शेख मतीन, शेख अकबर, शेख साबेर आदींनी परीश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

महिलासक्षमीकरणठाणे पोलीस दलातील शीतल खरटमल यांची ऐतिहासिक कामगिरी; बँकॉक आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी