vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला सुरवात

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला सुरवात

अमरावती, प्रतिनिधी): राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (वयोगट 14 वर्ष मुले/मुली) क्रीडा स्पर्धा सन 2025-26 चे आयोजन जिला क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्यातर्फे करण्यात येत आहे. या स्पर्धेला सुरवात झाली असून ही स्पर्धा 15 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (वयोगट 14 वर्ष मुले/ मुली) क्रीडा स्पर्धा सन 2025-26 महाराष्ट्रातील आठही विभागातील 16 मुले व मुलीचे संघ असे एकूण 300 मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धाचे मुले या वयोगटातील सर्व सामने सायन्सकोर मैदान, अमरावती व मुली वयोगटातील सर्व सामने पोलीस फुटबॉल क्रीडांगण, अमरावती येथे सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये सुरु झालेले आहेत.

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सायन्सकोर क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी नितीन चव्हाळ, जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष अरुण जयस्वाल, उपाध्यक्ष रविभाऊ कर्वे, अमरावती फुटबॉल संघटनेचे सचिव सुशिल सुर्वे, सेवा निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी हरिहर मिश्रा यावेळी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच ऑलिम्पीक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व्दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू दिपाली आरोळे यांनी सर्व खेळाडूंना क्रीडाशपथ दिली. त्यानंतर जोएल बांगर या राष्ट्रीय खेळाडूने आणलेल्या क्रीडा ज्योतीने मशालचे प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भाकरे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदिप इंगोले यांनी तर आभार सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांनी केले.

000000

संबंधित पोस्ट

क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

गाझीपूर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 175 वजनी गटात ठाण्याच्या सुश्मिताने पटकावले कांस्यपदक

vishwatmaklokswamivarta

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

दक्षिण कमांड सुवर्ण चषक 2025 – परंपरा व घोडेस्वारीतील उत्कृष्टतेचा उत्सव

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta

अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते बक्षिस वितरित