vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

दक्षिण कमांड सुवर्ण चषक 2025 – परंपरा व घोडेस्वारीतील उत्कृष्टतेचा उत्सव

दक्षिण कमांड सुवर्ण चषक 2025 – परंपरा व घोडेस्वारीतील उत्कृष्टतेचा उत्सव

राज्य प्रतिनिधी दक्षिण कमांड सुवर्ण चषक 2025 – परंपरा व घोडेस्वारीतील उत्कृष्टतेचा उत्सव प्रतिष्ठेची दक्षिण कमांड सुवर्ण चषक स्पर्धा रविवारी, 31 ऑगस्ट 2025 रोजी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबतर्फे (आरडब्ल्यूआयटीसी) पुण्यात घेण्यात आली. भारतीय अश्वांच्या शर्यतींच्या दिनदर्शिकेतील आपल्या समृद्ध परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत उत्साही सहभाग व जोशपूर्ण स्पर्धा पाहायला मिळाली.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, परम विशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम), अति विशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम), जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अत्यंत चुरशीची ही शर्यत जॉकी प्रशांत पी. धेबे यांच्या ‘मनीफेअर’ या अश्वाने जिंकली. आर्मी कमांडर यांनी विजेत्यांना मानाचा चषक प्रदान करून आरडब्ल्यूआयटीसीचे सुयोग्य आयोजनाबद्दल कौतुक केले.

दक्षिण कमांड सुवर्ण चषकाची सुरुवात 4 सप्टेंबर 1948 रोजी झाली होती. प्रारंभी ही शर्यत शर्यतीच्या निकषांतील विभागांनुसार वर्ग II आणि III मधील अश्वांसाठी खुली होती. यामध्ये दीड मैलाचे आव्हानात्मक अंतर समाविष्ट होते. 1986 मध्ये या शर्यतीला नोंदणींकृत दर्जा मिळाला व 1999 मध्ये तिला ग्रेड 3 इव्हेंट म्हणून मान्यता मिळाली, ज्यामुळे भारतीय अश्व शर्यतींतील तिचे प्रमुख स्थान अधोरेखित झाले.

क्रीडा महत्त्वाच्या पलीकडे, दक्षिण कमांड सुवर्ण चषक हा भारतीय सैन्य व रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून उभा आहे. ही दीर्घकालीन भागीदारी अश्व शर्यतींच्या चाहत्यांना प्रेरणा देत राहते आणि शिस्त, उत्कृष्टता व स्नेहभाव यांच्या परंपरा अधिक बळकट करते.

संबंधित पोस्ट

जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

मौलाना अबुल कलाम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडल्या ॲथलेटिक्स स्पर्धा