vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

लातूर, प्रतिनिधी: जिल्हास्तर आणि महानगरपालिकास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन लातूर येथील वर्ल्ड पीस स्कूल, साई रोड येथे करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 08 ते 09 जुलै 2025 रोजी, तर महानगरपालिकास्तरीय स्पर्धा 10 ते 11 जुलै 2025 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धा 15 वर्षांखालील मुले आणि 17 वर्षांखालील मुले-मुली या वयोगटांसाठी खेळवल्या जाणार आहेत. 15 वर्षांखालील मुलांची जन्मतारीख 01 जानेवारी 2011 किंवा त्यानंतरची, तर 17 वर्षांखालील मुले-मुलींची जन्मतारीख 01 जानेवारी 2009 किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघांनी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच, प्रत्येक संघाने याच संकेतस्थळावर 2,000/- रुपये प्रवेश शुल्क भरावे. यानंतर, https://dsolatur.com या संकेतस्थळावर 07 जुलै 2025 पर्यंत संघाची प्रवेशिका सादर करणे अनिवार्य आहे.

संबंधित पोस्ट

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन

विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवादा’ची नागपुरातून सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी साधला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन

क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta