vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मराठवाडा विभागस्तरीय ७० व्या कामगार नाट्य स्पर्धा-प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण उद्या(दि.१५)

मराठवाडा विभागस्तरीय ७० व्या कामगार नाट्य स्पर्धा-प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण उद्या(दि.१५)

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ७० व्या कामगार नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण बुधवार दि.१५ रोजी सायं.५ वा. ललित कला भवन उस्मानपुरा येथे होणार आहे, असे मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांनी कळविले आहे.

 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दि.२६ डिसेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत कामगार नाट्यस्पर्धा पार पडली. दररोज सायं.७ वा. ललित कला भवन उस्मानपुरा येथे या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि.१५ रोजी सायं.५ वा. ललित कला भवन येथेच होणार आहे.

 पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमूख सौ. वैशाली बोदेले ह्या राहणार आहेत. जिल्हा माहिती अधिकारी. डॉ. मिलिंद दुसाने, भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश सरचिटणीस सौ. मिनाताई मिसाळ तसेच युनायटेड ब्रेव्हरीज लिमि.चे वरीष्ठ मानव संसाधन व्यवस्थापक बिपीन सुपेकर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी स्पर्धचे परीक्षक श्रीमती सुरेखा मसाळ, प्रा. प्रदीप कांबळे तसेच प्रा. कैलास टापरे यांची देखील उपस्थिती असेल.

या नाट्यस्पर्धेत कामगार कल्याण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत गट कार्यालय छत्रपती संभाजीनगर १० गट कार्यालय, लातूर ३ गट कार्यालय, नांदेड ५असे एकूण १८ नाट्य संघांनी सादरीकरण केले. प्रेमानंद गजवी लिखित पांडुरंग वाघमारे दिग्दर्शित किरवंत, अरविंद लिमये लिखित बबन राऊत दिग्दर्शित पारध, डॉ.कमलेश महाजन लिखित रोहित देशमुख दिग्दर्शित चकवा चांदणं, प्रा.पंजाबराव मोरे लिखित संजय राजुरकर दिग्दर्शित आक्रोश, सतीश लिंगडे लिखित सुमीत शर्मा घोळमटण, जयंत पवार लिखित रमेश सोनवणे दिग्दर्शित अधांतर, सुहास देशपांडे लिखित डॉ. मनीष देशपांडे दिग्दर्शित ती रात्र हा दिवस , विजयकुमार राख लिखित प्रा. रामेश्वर झिंजुर्डे दिग्दर्शित अण्णांची शेवटची इच्छा, तसेच युवराज सुतार लिखित राकेश भालेराव दिग्दर्शित बेगमचे ईशारे यासह दर्जेदार नाटकांचे सादरीकरण झाले.  तरी नाट्य स्पर्धेतील नाटकांचा नाट्य रसिकांनी आस्वाद घ्यावा तसेच पारितोषिक वितरण प्रसंगी संघांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यरसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांनी केले आहे .०००००

संबंधित पोस्ट

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान @narendramodi आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड व नि:पक्ष पत्रकारिता करावी- पत्रकार अब्दुल कय्यूम,दर्पण दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न…

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

तीन महिन्यांचे धान्य एकत्र वाटप; ई-पॉस यंत्रणेबाबत अडचणी दूर करण्यासाठी निर्णय

vishwatmaklokswamivarta