vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन पुरस्कार..

कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन पुरस्कार..

 

बदनापूर, प्रतिनिधी ()-तालुक्यात कापूस उत्पादन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या शेतकर्‍यांच्या कामांना चालना मिळावी, त्यांचा उत्साह वाढून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी शेतकर्‍यांनी त्यांचे अनुकरण करावे. या हेतूने केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार प्रदान करण्यात येतो,यंदाचा पुरस्कार गेवराई बाजार येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा सुदामरावकान्हेरे यांना देण्यात आला असून नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सपत्नीक गौरव करून पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कापूस उत्पादनात वाढ होऊन शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या हेतूने केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर हे कार्य करत असते. त्या अंतर्गत वसंतराव नाईक कृषी महाविद्यालयाचे कृषी विज्ञान केंद्र बदनापूर अंतर्गत विशेष कापूस प्रकल्प उभारण्यात आला असून त्याचे समन्वयक तथा नोडल अधिकारी

म्हणून डॉ.एस. डी. सोमवंशी हे काम पहातात. या संस्थेच्या संयुक्त

विद्यमाने कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल गेवराई बाजार

येथील कृष्णा सुदामराव कान्हेरे यांची निवड करण्यात आली. कृष्णा कान्हेरे

हे गेवराई बाजार येथे शेती करतात, त्यांची पत्नी मंदा कान्हेरे, मुलगा रोहितही त्यांना या कामी मदत करतात. नेहमी नवनवीन पध्दत आणून आधुनिक शेती करण्याकडे या कुटुंबांचा ओढा असतो. शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी ते सदैव काम करत असतात.त्यांच्याबरोबरच त्यांचे वडिल सुदाम कान्हेरे, आई इंदूबाई कान्हेरे,राहुल कान्हेरे, ज्योती कान्हेरे हेही शेती कामात कायम मदत करत असतात.कापूस उत्पादन घेत असताना त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊन कापूस उत्पादनात वाढ केली. त्यांनी कापूस क्षेता्रत केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल नुकताच वाल्हा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात डॉ. एस. डी.सोमवंशी, डॉ. सुनिल महाजन (वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर),डॉ. ए.एस. तायडे (मुख्य नोडल अधिकारी, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर), डॉ. जी. एम. वाघमारे (संचालक, विस्तार शिक्षण, कृषी विद्यापीठ, परभणी) यांच्या हस्ते कान्हेरे दांपत्याचा सत्कारकरण्यात आला. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सत्कारित करण्यातआले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होतआहे.

०००००

फोटो ओळी…..८-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमान कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल बाजार गेवराई येथील प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आ

संबंधित पोस्ट

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी यांनी घेतला आढावाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधाचे काम समन्वयाने व गतीने पूर्ण करा

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण**दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न* 

vishwatmaklokswamivarta

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…