vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

 

जालना प्रतिनिधी –

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १७.०१.२०२५ रोजी शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम राबवुन काढण्‍यात आले. यामध्ये शहरातील वाळकेश्र्वर मंदिर ते जय नगरपर्यंत रहदारीस अडथळा निर्माण करणारे आरसीसी वॉल कंपाऊंड, आरसीसी दुकाने असे एकूण ०८-१० अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

सदरचे अतिक्रमण काढणेकरिता स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्री पंडित पवार, श्री. अशोक लोंढे, श्री. विलास गावंडे, श्री.हरीहर चांदोडे, सतिष पाजगे, श्री. निलेश शंकरपेल्‍ली, श्री. शोएब खान, अरुण वानखेडे, श्री. रविंद्र कल्‍याणी, राधेश्‍याम लोखंडे अधिनस्त जवान, सफाई कर्मचारी वाहन व्यवस्थासह उपस्थित होते.

 शहरातील सर्व नागरिकांना पुनश्‍च एकदा जालना शहर महानगरपालिका मार्फत विनंती करण्यात येते की, शहरात सदरची अतिक्रमण मोहीम अशीच निरंतर चालू राहणार आहे, तरी आपले अतिक्रमण क्षेत्र आपण स्वतः काढून घ्यावे, नसता जालना शहर महानगरपालिका मार्फत कारवाई करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन

वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये ब्रिटिश व्हाइसरॉयच्या तैलचित्रांच्या जागी आता परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांची तैलचित्रे..

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी – सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta