vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपडे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; हरियाणा सोनीपत येथील कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण…

बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपडे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; हरियाणा सोनीपत येथील कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण…

राज्य प्रतिनिधी –

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. सदर FIR सोनीपतमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे इंदूरमध्ये रजिस्टर करण्यात आलेल्या एका सोसायटीच्या 50 लाखांपेक्षा जास्त लोकांची कोटींचे रुपये घेऊन पळणाऱ्या कंपनीचं प्रमोशन हे कारण आहे. असल्याचे समोर येत आहे

सदर FIR मध्ये हरियाणाच्या सोनीपतमध्ये दाखल करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार-बॉलीवूड अभिनेता श्रेयस आणि अभिनेता आलोकनाथ हे दोघे बॉलिवूड सेलिब्रिटी या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रमोशन करत होते. तर सोनू सूदनं देखील या कंपनीच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. तर पोलिसांकडे दाखल केलेल्या FIR मध्ये या कंपनीनं 6 वर्ष लोकांकडून पैसे जमा केले. लोकांनी फिक्स्ड डिपॉजिट (FD) सोबत दुसऱ्या पद्धतीनं पैसे जमा करत मोठ्या प्रमाणात रिटर्न देण्याचं वचन दिलं आहे. इतकंच नाही तर लोकांना विश्वास जिंकण्यासाठी महागडे आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार ठेवले आणि मल्टीलेवल मार्केटिंग केल्यानं पैसे मिळतील असं आमिश दाखवलं. असं म्हटलं जातं की सुरुवातीला कंपनीमध्ये काही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा कोट्यावधी रुपये जमा झाले त्यानंतर सगळं काही बदललं. आता कंपनी पैसे द्यायला पुढे मागे विचार करते आणि जेव्हा लोकांनी पैसे मागितले तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाइल बंद केला. करण्यात आला असल्याचे गुंतवणूक दारांनी पोलिसांना सांगितले

याप्रकरणी कंपनीनं 2023 मध्ये कंपनीचा स्कॅम हळू-हळू समोर आला. मोठे दावे आणि आमिश दाखवत कंपनीला जे काही करायचं होतं ते सगळ्यांपासून लपवून ठेवलं. जेव्हा लोकांनी त्या सोसायटीच्या लोकांवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली त्यानंतर सोसायटीच्या मालकानं सगळ्या एजंट आणि गुंतवणूक करणाऱ्यांशी संबंध तोडले. जेव्हा लोकं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर सगळे कनेक्शन बंद केलं. जेव्हा लोकं त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा ऑफिसला टाळा लावून त्यांनी पळ काढला. असल्याची माहिती गुंतवणूकदारांनी दिली अधिकारी कर्मचारी हे कोटींची रक्कम घेऊन फरार झाले. 250 हून अधिक सुविधा केंद्रे होती जी एजंट्सद्वारे चालवली जात होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाइन पद्धतीने काम करत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अभिनेता तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावे दाखल आहेत.पानिपत सारख्या काही मोठ्या शहरांमध्ये सोसायटीच्या चेस्ट ब्रॉन्च सुरु केल्या. काही शहरांमध्ये सोसायटीनं स्वतःची रुग्णवाहिका सेवा तसेच मोबाईल एटीएम व्हॅन सुरू केल्या. या प्रकरणात 25 जानेवारी रोजी कोर्टात सुनावनी होणार आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण– मंत्री मंगलप्रभात लोढा· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात सुरू होणार ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ नवा अध्याय· उद्घाटन कार्यक्रमात होणार विश्वकर्मांचा सन्मान.

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात संपन्न

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन

रियान होल्डिंग प्रा.लि. आणि लॉयन्स हिल्स इस्टेट कंपनीत गुंतवणूक प्रकरणी फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखाकडे संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta