vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

 

राज्य प्रतिनिधी

 महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 ते 60 भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे सध्या संपूर्ण कुंभमेळा परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे

मिळालेल्या माहितीनुसार,प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा  2025) सुरू आहे. गंगा-यमुना-सरस्तवी संगमावर मौनी अमावस्येच्या रात्री करोडो भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. यादरम्यान 29 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनूसार, या घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 ते 80 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेवर मोदी यांनी दुख: व्यक्त केले. ट्विटद्वारे त्यांनी भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, ‘प्रयागराज महाकुंभात घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. घटनेत ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. सर्व जखमींची प्रकृती लवकर ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे. मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले

संबंधित पोस्ट

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती !  सुराज्य अभियान,झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने देशातील वीस मुलांचा सन्मान; महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश

vishwatmaklokswamivarta

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

विशेष लेख -: इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय धर्मसंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न !प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची ,भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न