vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शेतकऱ्यांना प्राधान्य ; दलित आदिवासींना पाठबळ आणि मध्यम वर्गीयांना साथ देत देशाचा विकास घडविणारा आदर्श अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*शेतकऱ्यांना प्राधान्य ; दलित आदिवासींना पाठबळ आणि मध्यम वर्गीयांना साथ देत देशाचा विकास घडविणारा आदर्श अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2025 -26 चा सादर केलेला अर्थसंकल्प एक आदर्श अर्थसंकल्प आहे.शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा; दलित आदिवासींना पाठबळ देणारा; मध्यमवर्गीयांना साथ देऊन देशाचा विकास घडविणारा अर्थसंकलप आहे.या अर्थसंकल्पाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत.विरोधी पक्षाला हा अर्थसंकल्प निरूपयोगी वाटत असेल तर विरोधी पक्षाचा हा दृष्टिकोनच निरूपयोगी आहे असा टोला रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांना लगावत अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय अर्थसंल्पात दलित आदिवासींसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.त्यात सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत विविध कल्याणकारी योजनांसाठी 1 लाख 68 हजार कोटी तर आदिवासी कल्याण मंत्रालय साठी 1 लाख 19 हजार कोटींची तरतूद आहे.त्यामुळे दलित आदिवासींच्या कल्याणासाठी या वंचित घटकांना पाठबळ देणारा हा अर्थसंकल्प आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

शेतकऱ्यांना प्राधान्य देत अन्नदाता शेतकरी हा विकासाच्या गाडीचे इंजिन आहे.शेतकऱ्यांना प्राधान्य देत त्यांच्या विकासासाठी उत्पादन वाढीसाठी अनेक योजना अर्थसंकल्पात आहेत.या अर्थसंकल्पात विद्यार्थी; गृहिणी; ज्येष्ठ नागरिक; दिव्यांग तसेच उद्योजक ; नोकरदार मध्यम वर्ग सर्व वर्गाचे हित साधणारा हा आदर्श अर्थसंकल्प आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

महाराष्ट्र राज्यात मेट्रो ;रेल्वे;नदी संवर्धन; सिंचन आदी प्रकल्पांसाठी भरीव निधी देण्यात आला आहे.त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत आहोत असे ना.रामदास आठवले म्हम्हणाले.

0000000

 

संबंधित पोस्ट

अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण

vishwatmaklokswamivarta