vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इयत्ता 10वी व इयत्ता 12 च्या आगामी परीक्षांसंदर्भात शंकांचे निरसनअथवा मार्गदर्शनासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

इयत्ता 10वी व इयत्ता 12 च्या आगामी परीक्षांसंदर्भात शंकांचे निरसनअथवा मार्गदर्शनासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

 

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.11 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2025 या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा दि.21 फेब्रुवारी ते दि.28 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक/शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सुविधा दि.04 फेब्रुवारी 2025 पासून कार्यान्वित करण्यात येणार असून या नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत सुरु गहील.

मुंबई विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी व मंडळ कर्मचारी यांची नावे व दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक इ. तपशील पुढीलप्रमाणे:-हेल्पलाईनसाठी दूरध्वनी क्रमांक: 022 27893756 व 022 27881075

कार्यालयातील हेल्पलाईनसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी:सहाय्यक अधीक्षक तथा सहाय्यक सचिव (प्र.) श्रीमती कल्पना पवार (9423476023), सहाय्यक अधीक्षक चारुशिला आढाव (9890261046), सुदाम चव्हाण (9423961014) व कमलाकर गांगोडे (9146541773).

समुपदेशक:श्रीकांत शिनगारे (9869634765), मुरलीधर मोरे (7977919850 / 9322105618, 022 27893756 / 022 27881075), हयाळीज वी. के. (9423947266), अनिलकुमार गाढे (9969038020), विकास जाधव (9867874623), विनोद पन्हाळकर (9527587789), संजय जाधव (9422594844 / 9657079344), चंद्रकांत मुंढे (8169699204), अशोक सरोदे (9322527076 / 8888830139), शैलजा मुळ्ये (9820646115), शेख अखलाख अहमद अ. रज्जाक (9967329370), स्नेहा चव्हाण (8369015013), उज्वला झरे (9920125827).तरी, विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांनी या हेल्पलाईन व नियंत्रण कक्षाच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव (प्र.) ज्योत्सना शिंदे-पवार यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार; पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती• बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची पाहणी

vishwatmaklokswamivarta

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना.

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ आंबेडकर चळवळीतील गुणाबाई गाडेकर यांचा 50 व स्मृतिदिन धारावी संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई होणार…. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे.