vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट दावोस गुंतवणूक करार, उद्योग संधीसाठी केले अभिनंदन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट दावोस गुंतवणूक करार, उद्योग संधीसाठी केले अभिनंदन…

 

मुंबई, प्रतिनिधी:- अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. हँकी यांनी दावोस येथील गुंतवणूक करारांच्या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे श्री. हँकी यांनी सांगितले. तसेच राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल चर्चा केली.

राज्यात ऊर्जा क्षेत्रात असलेली संधी, विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी उद्योग विभागाचे सचिव पी.अनबलगन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आदी उपस्थित होते.0000

संबंधित पोस्ट

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

मोर्शीत एकात्मिक प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;सर्व शासकीय कार्यालये आता एकाच छताखाली येणार

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

आताची मोठी बातमी. कोकणातील, चिपळूण मध्ये पिंपळी कॅनॉल च्या पुलावर रीक्षा,थार आणि ट्रक अपघात एकूण चार ठार

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार,पुढील काही तास धोक्याचे 5 दिवस राज्यासाठी IMDने तीव्र हवामान अलर्ट जारी केले…