vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठीडॉ. विनोद मोहितकर यांचा ‘एआयसीटीई’कडून मानद फेलोशिपने सन्मान..

तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठीडॉ. विनोद मोहितकर यांचा ‘एआयसीटीई’कडून मानद फेलोशिपने सन्मान..

 

मुंबई, प्रतिनिधी : तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेवून तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना २०२४ या वर्षाकरिता मानद फेलोशिप (Honorary Fellowship) हा सन्मान पंजाबचे वित्त मंत्री व AICTEचे चेअरमन प्रा. डॉ. टी जी सितारामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या सन्मानाचे श्रेय डॉ. मोहितकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग श्री. वेणुगोपाल रेड्डी, तसेच यापूर्वीचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनास दिले तसेच सर्व अधिकार कर्मचारी यांनी सहकार्य केले असल्याचे नमूद केले.

तंत्र शिक्षण संचालक डॉ. मोहितकर यांना त्यांच्या कामाची दखल घेवून नुकतेच प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान व आयुक्त, राज्य सामायिक परीक्षा कक्ष या भारतीय प्रशासकीय सेवा स्तराच्या पदाची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे.

देश पातळीवरील इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (Indian Society of Technical Education (ISTE), New Delhi) या संस्थेचे वार्षिक अधिवेशन नुकतेच लँमरीन टेक स्किल्स युनिव्हर्सिटी, रोपर (पंजाब) (Lamrin Tech Skill University, Ropar (Panjab) येथे झाले.

 यावेळी निती आयोग सदस्य (केंद्रीय राज्यमंत्री दर्जा) डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य तसेच लँमरीन टेक स्किल्स युनिव्हर्सिटी, कुलपती डॉ. संदीप सिंग कावरा, आयएसटीई अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, आयबीएमइंडिया लिमिटेड सल्लागार व हेड प्रोग्राम डेव्हलपमेंट श्री. संजीव मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबईच्या ‘वेव्हज्’ परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर…

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

vishwatmaklokswamivarta

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

vishwatmaklokswamivarta

36104 नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी घेतला सन 2024-25 वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ..           

डिजिटल पद्धतीने होणार जनगणना – २०२७ : प्रक्रिया होणार दोन टप्प्यांत पूर्ण-जिल्ह्यात ३० चार्ज अधिकारी व हजारो प्रगणकांची नियुक्ती विविध ठिकाणी प्रशिक्षणास सुरुवात