vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

36104 नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी घेतला सन 2024-25 वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ..           

36104 नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी घेतला सन 2024-25 वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ..

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्येही विविध घटकांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये शिष्यवृत्ती तसेच इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.

सन 2024-25 या वर्षाची शिष्यवृत्ती रक्कम याच वर्षात वितरित करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत देण्यात आले होते व त्याचा सातत्यपूर्ण आढावा आयुक्तांमार्फत घेण्यात येत होता. त्यातही विशेषत्वाने आयुक्तांच्या निर्देशानुसार हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारून त्यांच्या पडताळणीनंतर शिष्यवृत्ती रक्केमेचे वितरण गतीमानतेने ऑनलाईन पध्दतीने करण्यावर विशेष भर देण्यात आला.

शिष्यवृत्ती योजनेकरिता विविध 6 घटकांतर्गत एकूण 43,791 एवढे अर्ज प्राप्त झालेले होते. या अर्जांची पडताळणी करुन त्यापैकी 36,104 लाभार्थींचे अर्ज योजनेच्या अटी / शर्तीनुसार पात्र ठरले. सदर पात्रता निश्चित झालेल्या एकूण 36,104 विद्यार्थ्यांना एकूण रक्कम रु.27 कोटी 99 लक्ष 57 हजार 200 एवढ्या रक्कमेच्या शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीव्दारे करण्यात आले आहे.

  विविध घटकांतील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येते. अ. क्र. इयत्ता शिष्यवृत्ती

1. 1 ली ते 4 थी पर्यंत (प्राथमिक) रु. 4000

2. 5 वी ते 7 वी पर्यंत (माध्यमिक) रु. 6000

3. 8 वी ते 10 वी पर्यंत (उच्च माध्यमिक) रु. 8000

4. 11 वी ते 12 वी पर्यंत (विद्यालयीन) रु. 9600

5. महाविद्यालयीन ते पदवी रु. 12000

6. पदवीनंतरचे शिक्षण रु. 16000

7. तांत्रिक / व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी रु. 8000 घटकनिहाय शिष्यवृत्ती वितरण केलेल्या लाभार्थ्यांचा तपशील – अ. क्र. योजनेतील घटक लाभार्थी संख्या खर्च रक्कम 1. आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुला – मुलींना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. 24173 18,30,86,400

2. इयत्ता 1 ली ते पदवीपर्यंत गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. 5498 4,12,12,40,

3. नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.   2476 2,19,07,600

4. नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.   2755 2,26,49,200,

5. विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे. 121 1,03,06,400

6. नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण / बांधकाम / रेती / नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. – 81 7,95,200  एकूण – 36104 27,99,57,200

 सदर योजना ही खाजगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाव्यतिरिक्त शिक्षण घेणा-या 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणा-या विद्यार्थ्यांकरिता असून याव्यतिरिक्त मागासवर्गीय विद्यार्थी, स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी, महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांची मुले, विधवा – घटस्फोटित महिलांची मुले तसेच महापालिका क्षेत्रातील दगडखाण – बाधकाम – रेती – नाका कामगारांची मुले यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात आहे.

या शिष्यवृत्तीव्दारे विद्यार्थी, पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चात मोठ्या प्रमाणात मदत होते. त्या अनुषंगाने या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती रक्कमेचे वितरण आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून झाल्याने सुनियोजितता, पारदर्शकता व गतीमानता प्राप्त होऊन विहित वेळेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कमेचे वितरण झालेले आहे. याबद्दल विद्यार्थी, पालक यांच्यामार्फत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

0000000

संबंधित पोस्ट

मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग राहण्याचे आव्हान-कौतिकराव ठाले पाटील

vishwatmaklokswamivarta

विक्रोळीत ट्रान्सजेडर फॅशन होणार, सिद्धि महिला कल्याणकारी संस्थेचा अभिनव उपक्रम ..

ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या माध्यम कक्षातील-अधिकारी-कर्मचाऱ्यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :पोलीस निरीक्षक के. नारायण नाईक यांची आचारसंहिता, माध्यम कक्षास भेट

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाचे आज  उद्घाटन