vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

 

   मुंबई, प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी या महोत्सवाला उपस्थित रहावे अशी विनंती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे भेट घेवून विनंती केली असून त्यांच्या विनंतीला राज्यपाल यांनी संमती दर्शवून ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

   पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिंटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती त्यांनी राज्यपाल यांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी उद्घाटन होणार आहे. तसेच या उद्घाटनाप्रसंगी मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत.     राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ चरित्र ग्रंथ पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिला. दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप-हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध..

vishwatmaklokswamivarta

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

स्वच्छताकार्यातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रशिक्षणवर्ग

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप: